हिंमतरावांची दिवाळी
हिंमतरावांची सकाळी सकाळीच गडबड चाललेली पाहून शेवंता त्यांच्याकडे आश्चर्यांने पाहू लागली. आज गडबडीने हिंमतराव कुठे चालले होते म्हणून त्यांनी आश्चर्याने तोंड उघडलं; पण त्यांचे भाव पाहून हिंमतरावांनी आधीच सांगितलं.
‘महत्त्वाच्या कामासाठी चाललो आहे. कृपा करून कुठं चाललात अस्सं भस्सं करून विचारु नका.’
शेवंता एवढे ऐकुन गप्प बसणाऱ्यातली नव्हतीच.
‘म्हणजे, मी तुमच्या कामात टांग अडवते म्हणा की.’
‘आपण टांग अडवली नसती तर कुठल्या कुठ असले असतो आम्ही’’
हिंमतराव पुटपुटलेच.
‘हुँ, काय म्हणालात .’
‘आँ, कुठे काय आपलं सहजच.’
काय म्हणालात ते सांगा नाही तर…’
‘नाही तर काय…
‘ऊं, जाईन मी…’
‘कुठे, माहेरी. हे ऐकून तर कंटाळा आलाय. दर दिवाळीला आपले माता-पिता इकडेच प्रस्थान करतात.’
‘माहेरी नाही हो. दिवाळीसाठी साड्या आणायला. अन् आई बाबाचं म्हणाल तर, ते यावर्षी तयार नव्हते यायला; पण मीच आग्रह केला.’
‘हुं, नाहीतर आलेच नसते म्हणा की, लग्नाला बारा वर्षे म्हणजे एक तपपूर्ती सोहळा नुकताच पार पडलाय. पहिली दिवाळी सोडली तर बाकी सगळ्या दिवाळ्या मीच पार पाडतो. पहिल्या दिवाळीला माझ्यासारखा नशिबवान मीच असं वाटलं होत. काय तो थाट दिवाळीचा. चार दिवस संपूच नये वाटत होतं.’
शेवंता हिंमतरावाकडं रागानं पहात मनात विचार करत होती आणि आता काय झालंय यांना. मी काय जाचात ठेवलंय. उलट यांच्या कुरकुऱ्या स्वभावामुळे माझं स्वास्थ्य बिघडतंय वरचेवर, ती हे सर्व मनातच विचार करत होती; पण हिंमतराव चांगलेच मनकवडे होते.
‘आँ, काय म्हणालात स्वास्थ्य बिघडतंय. चांगला ऐंशी, किलोचा
काटा पार केलात. अन् म्हणे स्वास्थ्य बिघडतंय.’
तशी शेवंता बडबडलीच,
‘वजन वाढतंय डिप्रेशनमुळे, डिप्रेशन म्हणजे उदासीनता. नाहीतर लग्नाच्या वेळेस माझी झिरो फिगर होती.’
हिंमतराव झिरोफिगर आठवू लागले. एकदम काय झिरो नव्हती; पण लांबून पाहिलं तर सारं शरीर वर्तुळाकार दिसत होतं. हे बाकी खरं होतं. तसं त्यावेळेसचा शून्य बराच लहान होता. पण आजकालचा शून्य बाकी ‘एवढा मोठा भोपळा, आकाराने वाटोळा’ या बालगीता प्रमाणे भासत आहे..
‘अं, मला काय म्हणालात काय?’
म्हणजे घरात आमच्या नेहमीचच आहे म्हणा. गाढवा पुढे वाचली
गीता अन् कालचा गोंधळ बरा होता.’
खरंच तुम्ही पहिल्या दिवाळीला घरी आला होता. त्यावेळेस तर
मला खूप आनंद झाला होता. आपलं लग्न होऊन चार तर महिने झाले होते.’
हिंमतरावांना लग्नानंतरचे दिवस फुलपाखराप्रमाणे रंगबिरंगी भासत होते. नंतर मात्र त्या रंगाचा बेरंग होत गेला तो भाग वेगळा. त्यापेक्षाही लग्नापूर्वी म्हणजे लग्न जमल्यापासून लग्न होण्यापर्यंतचा काळ जरी एक वर्षाचा होता. तरी तो खूप मोठा आहे, असे प्रथम वाटले; पण नंतर हळूहळू भेटीगाठी वाढल्या अन् त्यातले सारे क्षण मोरपीसाप्रमाणे हळूवार स्पर्शून गेले की मग इंद्रधनूप्रमाणे वाटे. लग्नापूर्वीच्या दिवाळीमध्ये घरच्यांपासून चोरून भेटताना शेवंताने फराळ आणला होता. अन हिंमतरावांनी फटाका नेल्या होत्या. काय मजा झाली. सेवनबार लावताना त्याची दिशा चुकली. अन् शेवतांच्या त्या सेवनबारमुळे हिंमतरावांची पळता भुई थोडी केली. शेवंताने स्वतः केलेला लाडू हिंमतरावांना दिला. यावर त्यांनी प्रेमाने तूच भरव असे सांगितले. शेवंताने लाडू हिंमतरावांच्या तोंडात घातला; पण लाडूचा तुकडा काही पडेना. शेवटी लाडू जमिनीवर चेंडूसारखा फेकला, फोडला अन खाल्ला.
यापेक्षा भयानक अवस्था हिंमतरावांची तेव्हा झाली जेव्हा त्यांनी चिवडा खाल्ला. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या; पण बिच्चारे सांगतात कुणाला
‘अगं हे प्रेमाश्रू आहेत’ असे म्हणून वेळ मारून नेली. अन् आनंदाश्रू, दुःखाश्रु सोबत प्रेमाश्रुंचाही शोध लावला. लाडू घट्ट जरी झाला तरी चवं खूप छान आहे. अन् चिवड्याला तिखट खूप झाले तरी बाकी चिवडा एकदम झक्कास. असं त्यांनी सांगितलं. लग्नापूर्वी सगळेच गोड वाटतं. लग्नानंतर मात्र वाटून घ्यावं लागतं. तसं कुणीतरी म्हणलेलच आहे म्हणा,
‘शादी का लड्डू, जो खाये वो पछताये, जो ना खाये वो भी पछताये.’
तसं हिंमतरावांना पहिली दिवाळी खूपच स्मरणात राहिली. त्यांची अपूर्वाई काही औरच होती. हिंमतरावांचे ज्येष्ठ बंधू बबनराव. त्यांची सासुरवाडी खेड्यातली. बबनरावांची मंडळी बबीता जास्त काही शिकलेली नव्हती; पण दिसायला लई झ्याक. अन् व्यवहारातपण लय हुशार. शेतीभातीतली सगळी कामं मन लावून करत होती दोघं. खेड्यातच रहायला आवडायचं त्यांना. कधी शहरात या चार दिवस म्हटलं तर ‘करमत नाही तकडं.’ असं म्हणायचे; पण हिंमतरावांनी स्वतःच्या पहिल्या दिवाळसणाला मात्र आई-वडील, भाऊ-भावजय, छोटी बहिण, आक्की साऱ्यांना बरोबर नेलं होतं. शेवंताच्या घरच्यांनी सगळ्यांनी यायचं हं’ असं आमंत्रण दिलंच होतं की. दिवाळीच्या सणाची शेवंतानी
खूप छान तयारी केली. मंडळी किती दिवस थांबणार हे विचारून
त्यानुसार खाण्या-पिण्याचं, फिरण्याचं, खरेदीचं नियोजन केलं होतं. हिंमतरावाचं कुटुंब खेड्यातलं त्यामुळे त्यांनी येताना छान बोचकी बांधून अन् ट्रंका भरून सामान आणले. फराळाचं पण गावाला पुरलं असतं, एवढं आणलं होतं. एक करंजी वाढली म्हणजे पोटचं भरावं अशी, शेवंताला तसं हे जाणवत होतंच की आपलं सासर-माहेर म्हणजे धृवाची दोन टोकं आहेत; पण शेवटी नाइलाज. शेवंताच्या गावाला म्हणजे पुण्याला स्टॅंडवर गाडी धाडली होती पाहुण्यांनी, बंगला पाहून तर आक्की चाटच पडली. लग्न जमवताना फक्त हिंमतराव अन आई- वडिल बाहेरची पाच- पन्नास माणसं होती. हिंमतरावांना बंगल्याच्या दारात ओवाळायला शेवंता आली तर ओळखूच येईना. सासरी नऊवारी, मोठं कुंकू, नथ, हातभर हिरव्या बांगड्या, आंबाडा अन् माहेरी पातळ झार
पातळ घातलेले. घातलं काय अन् नाय काय फरकच नाय. केसाचं वेगळंच काय तरी केलेलं. असं वाटत होत जसं चिमणीचा खोपाच डोक्यात तयार केला. दोन्ही हातात कशीबशी एक एक बांगडी होती. गळ्यातलं काळ्या मण्याचं चांगलं चार पदरी ठसठशीत केलं होतं; पण तिच्या गळ्यात आता नाजूक असं सोन्याचं मिनी गंठण होतं. ओवाळून घेतल्यावर सगळी मंडळी बंगल्यात गेली. पोरगी पहायच्या वेळेस बंगला काय लय निरखून पाहिला नव्हता; पण पोरगी चांगली पारखली होती. सगळ्या गोष्टी बघून सगळीच गांगारून गेली. मंदाकिनी बाईंच्या गळ्यात पडून आक्का बाई कडकडून भेटल्या अन् म्हणाल्या, ‘तुम्ही कामून येवड्या खराब झाला वो, तुम्हास्नी पोरीची लई काळजी वाटती का? आम्ही हाव नवं. सोताच्या जीवाला चार घास खात जावा.’
विहिनी विहिनीचं कोडकौतुक पाहून शेवंताचे वडील तर चकित
झाले. मंदाकिनीबाईंना मात्र त्या खराब झाल्याचं ऐकून राग येण्याऐवजी आनंद झाला. त्या म्हणाल्या,
‘वाव! माझं जिम सक्सेस!’
मी वाईट वाटून म्हटलं तर ही बाय तर नाचाया लागली.’ आक्काबाई मनात म्हणाल्या. तसं मंदाकिनी बाई म्हणाल्या,
‘अहो ताई, मी जिमला जाते तेव्हापासून पाच-सात किलो कमी झाले खरं; पण हे घरात कुणी बोललंच नाही. तुमच्या कडून कळलं, तसं दिसू पण लागलं.’
मेलं लक्षण, लग्नात हिरव्यागार साडीत टच्चं कणसावाणी भरल्यागत दिसत होती. अन् आता पाक वाळून गेली. असल्या दिसण्याचं हिला कौतीक वाटतंया. बाहेरची पाच- पन्नास माणसं होती. हिंमतरावांना बंगल्याच्या दारात ओवाळायला शेवंता आली तर ओळखूच येईना. सासरी नऊवारी, मोठ्ठ कुंकू, हातभर हिरव्या बांगड्या, आंबाडा अन्न माहेरी पातळ झार पातळ घातले काय अन् नाय काय फरकच नाय. केसाचं वेगळंच काय तरी केलेल. असं वाटत होत जसं चिमणीचा खोपाच डोक्यात तयार केला. दोन्ही हातात कशीबशी एक एक बांगडी होती. गळ्यातले काळ्या मण्याचं चांगलं चार पदरी ठसठशीत केलं होतं; पण तिच्या गळ्यात आता नाजूक असं सोन्याचं मिनी गंठण होतं. ओवाळून घेतल्यावर सगळी मंडळी बंगल्यात गेली. पोरगी पहायच्या वेळेस बंगला काय लय निरखून पाहिला नव्हता; पण पोरगी चांगली पारखली होती. सगळ्या गोष्टी बघून सगळीच गांगारून गेली. मंदाकिनी बाईंच्या गळ्यात पडून आका बाई कडकडून भेटल्या अन् म्हणाल्या, तुम्ही कामून येवड्या खराब झाला वो, तुम्हास्नी पोरीची लई काळजी वाटती का? आम्ही हाव न पाच-सात किलो कमी झाले खर; पण हे घरात कुणी बोललंच नाही. आकाबाईला गणप बसा असडोळा खुणवल्ल, नेवण हुन निवात।
यावर बबनरावाना आका बाई म्हणाल्या,
‘जेवन कस जमिनीवर बसूनशान करावं.’
पाय लोंबकाळत तर त्यांना जेवण गेलं नाही हे सारं शेवंतानं ऐकलं; पण सोडून दिलं, कारण जर आईला सांगितलं तर परत रंगीत सामना रंगायचा, तो ही विनातिकिटाचा. मंदाकिनी बाई
कामानिमित्त लेकीला घेऊन बाहेर गेल्या, बंगल्यात एक बाई, एक नोकर अशी दोन नोकर माणसं होती. शेवंताचे वडील पण बाहेर गेले होते. बाईन भांडे घासल्यावर तिला एवढी सारी भांडी बंगल्याच्या समोरच्या बाजूला आकाबाईंनी वाळायला घालायला लावली कापडं पण लवकर सुकतील पुढंच घाल म्हणून सोबत आणलेलं धोतर, साड्या अन् पॅण्ट, शर्टची रांग लावली. तासाभरात मंदाकिनी बाई बाहेरून आले. अन् आपल्या बंगल्याचं साजरं रुपडं पाहून घाबरल्या . बंगल्याच्या आवारात भांड्या-कुंड्याचा
राडा तर होताच; पण पताका लोंबाव्या तशा, कपडे लोंबत होते. अन् पारावर माणसं गप्पा मारायला बसतात, तशी सोसायटीतील वयस्कर माणसं गप्पा मारत ठाण मांडून बसली होती. मंदाकिनीबाईंना आता काय म्हणावे तेच सुचेना. बोलावे तर पंचायत, बोलून चालून सासरची मंडळी. त्यांची मन दुखवून कसं चालेल. म्हणून शेवटी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन केला. घरात जाऊन नोकर माणसांना ओरडल्या; पण त्यांनी अक्काबाईकडं बोट केलं. एवढ्यात शेजारच्या तिरळे वहिनी आल्या.
‘पिंकू, पिंकू, पिंकू आली म्हणे दिवाळीला.’
अक्काबाई त्यांच्या कडे पाहू लागल्या. ही बाई नक्की कुणाला हाका मारती, कुणास ठाऊक? असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. एवढ्यात शेवंता आलीच. ती त्या काकूंबरोबर गुलूगुलू बोलताना पाहुन यांना नवल वाटलं. त्या म्हणल्याच,
‘त्याना त्या पिंकी का चिंकीला बोलावलं होतं म्हण.’
‘अहो आत्ती मलाच पिंकी म्हणत होते. मला शेवंता नाव आवडत नव्हतं. आमच्या आज्जीची इच्छा म्हणून हे नाव ठेवलं: पण मला सगळे पिंकीच म्हणतात. मनातल्या मनात आक्काबाई काय विचार करत होत्या माहित नाही; पण चेहरा मात्र हिंग खाल्ल्यासारखा केला होता त्यांनी. हिंमतरावांची आई अन् बहीण जरी हक्कान्, अधिकारान सगळं करून घेत होते, तरी आण्णासाहेब शांत होते. थोरला भाऊ भावजय शहरातल्या वातावरणानं बुजून गेल्यासारखे झाले. आक्की तर वहिनीच्या माहेरात बिनधास्त वावरत होती. म्हणून तर सकाळी अंघोळीला टबात तासभर बसली. बाहेरून वहिनी शेवंताबाई ओरडल्या; पण तिनं जणू
ठरवलंच होतं. शब्द कानांवरून गेले तरी चालतील, कानाच्या आत शिरू द्यायचे नाही. दसऱ्या दिवशीच्या अंघोळीचा, थाटच वेगळा. सगळ्याच्या आगळ्या वेगळ्या तर्हा. अन् तिसऱ्या दिवशी भाऊबीज. शेवंता तिच्या भावाला आंघोळ घालायला लवकर उठल, असा आक्काबाईंच्या अंदाज हवामान खात्यासारखाच चुकला. तिला उठल्यावर विचारलं तर ती म्हणाली, ‘दादाला तेल लावून घ्यायला आवडत नाही.’ एवढ्यात मंदाकिनी बाईंच्या खोलीच्या दरवाज्याचा आवाज आला. पाहुणे मंडळीच्या आवाजानं त्या जाग्या होऊन बाहेर आल्या. तसं त्या आठच्या आधी उठत नाहीत. सहा वाजता वगैरे उठायचा त्यांना कंटाळा येई. एवढ्या पहाटे उठूच वाटत नाही, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं. त्यांचा अवतार बघून तर आक्काबाई चाटच पडल्या. पांढरा शुभ्र झगा, मोकळे केस, गळ्यात मंगळसूत्र नाही, हातात बांगड्यांचा पत्ता नाही की पायात जोडवे नाही. आक्काबाईंच्या नजरनंच सारं काही सांगितले होते. त्यामुळे आलेच दोन मिनिटात म्हणून त्या पटकन आंघोळीला गेल्या. अक्काबाई विचारच करत होत्या. बाई उठायच्या आत समदी काम उरकलीत बी. आता ही टवळी नुसती त्वांड वर करून फिरणार. शेवटी विहीनीला काय बोलायचं. आपली सून नीट वागली तरी बस्सं म्हणून गप्प बसल्या.
आग्रह झाला म्हणून दोन-चार दिवस राहून हिंमतराव शेवंता सोडून सगळी गावाकडं गेली. कधी एकदा गावाकडं जावं असं झालतं सगळ्यांना. मागून आठ दिवसांनी नवीन जोडी आलीच. येताना त्यांना माहेरची गाडी सोडायला आलती. येताना आयत्या फराळाचे बॉक्स अन करंड्या भरून फळं, सगळ्यांसाठी कपडे, जावयाला-लेकीला सोनं, ओव्हन अन् सामान, आकाबाई म्हणल्या पण सुनेला,
‘आम्हाला येताना घेतली होतीच की कापडं, अजून कशाला धाडली. आम्हाला काय मिळत नाय का?’
आण्णासाहेबांनी गप बसायची खूण केली म्हणून गप बसल्या, सगळ्या गावाला बोलावलं होतं कौतुक बघायला. शिदोरी सोडायच्या निमिनानं बाया कौतुकानं ओव्हन बघून म्हणत होत्या. ‘छोटा टी.व्ही. दिला लेकीला बगायला. घरात मोठा हायचं; पण आपल्या खोलीत ठिवून काय बी बगायला येतं.’
म्हणून तोंडाला पदर लावून फिदीफिदी हसल्या.
तशी शेवंतानं ओव्हनमध्ये काय, काय होतं ते सांगून सगळ्यांना त्यात गरम ढोकळा करून दिला. काही का असंना, अक्काबाईंना शेवंता चा अभिमान वाटला खरा. पहिल्या दिवाळीला एवढी वर्षे झाली.चांगलचुंगलं खाऊन चळवळीच्या शेंगेचा भोपळा मात्र झाला. दिवाळी, दसरा, संक्रात असं एक एक सण साजरे करण्यात शेवंता तरबेज झाली. शहरी भाषा जाऊन फक्कड गावठी बोलू लागली. चिमी, राघू दोन मुलं झाली. हिंमतरावांच्या संसारात एकरूप झाली. गावाकडची दिवाळी आवडती म्हणून मात्र हिमतरावाकडं
सासू-सासऱ्यांच्या वाऱ्या वाढल्या. अक्काबाई अन् आण्णांना घरं भरलेली लई छान वाटायचं. यावेळेला पण सगळी येणारच होती दिवाळीला.