कुसुमाग्रज
काव्यप्रतिमा अन् सरस्वतीच्या उपासने
लिहिले जे त्यांनी मन भारावले
उत्स्फूर्त ती लेखनी चाले
विशाखा काव्य अजरामर जाहले
थरार पाहणाऱ्यांच्या होई मनाचा
लिहिल्या अशा थोर भूमिका
त्यासम तेच होते विराट
हरपले भान पाहुनी नटसम्राट
माय मराठीची केली सेवा
ज्ञानपीठ सन्मान उचित झाला
जादूची होडी, श्रावण लिहूनी
अधिराज्य केले मराठी मनावरी
सौ. आशा अरुण पाटील सोलापूर