महाकवी कालिदास

महाकवी कालिदास

पुरा कवीनां गणनाप्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासाः ।

अद्यापि तत्तुल्यकवेरभावात् अनामिका सार्थवती बभूव।।

       भारतीयांना अभिमान वाटतो असे मानाचे सर्वश्रेष्ठ महाकवी कालिदास हे केवळ कविच नाही तर ते चित्रकार, वैज्ञानिक होते. कालिदास म्हणजे रससिद्ध कविश्वर. संस्कृत वाङ्मयात नव्हे तर जागतिक वाङ्‌मयात त्यांचे स्थान अद्वितीय आहे, कालिदासांच्या ‘मेघदूतम्’ मधील
   ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ ही ओळ. या ओळी श्रवण होताच आपल्याला आठवतात ते महाकवि कालिदास. त्यामुळे आषाढाचा पहिला दिवस महाकवि कालिदास दिवस म्हणूनही साजरा केला जातो.
   कालिदासांबद्दल अनेक दंतकथा सांगितल्या जातात. कालिदास गरीब ब्राम्हणाच्या घरी जन्माला आले. पण पोरपणीच पोरकेपणा त्यांच्या नशिबात आला. त्यांचे पाळण्यातले नाव जरी माहित नसले तरी त्यांची कालिमातेवर अलोट भक्ती होती, म्हणून त्यांचे नाव कालिदास पडले असावे. एका गवळ्याच्या घरी त्यांचे बालपण आनंदात गेले. बालपणी जे शिक्षण मिळाले ते तेवढे विद्वत्तापूर्ण नव्हते. कालिदास जेव्हा लग्नायोग्य झाले. तेव्हा त्याच देशाच्या राजकन्येचे लग्न  होण्याचे तेव्हा घाटू लागले. राजकन्येचे लग्न काही कुठे जमता जमेना. कारण राजकन्या सुंदर, बुद्धिमान विद्वान परंतु अत्यंत गर्विष्ठ आतापर्य आलेले सारे वर तिला क:पदार्थ वाटत. त्याच राज्याचा मंत्री तिच्यासोबत लग्नाला इच्छुक होता. राजकन्येच्या लग्नाची स्थिती पहाता, ती आपल्यासोबत लग्नास सहज तयार होईल असे त्याला वाटले. परंतु तीने त्याची मागणी धुडकावून लावली. मंत्र्याने सूड उगवण्यासाठी एक योजना आखली. कालिदासासोबत पट्टीचे विद्वान देऊन, त्याला राजकन्येचे आव्हान स्विकारण्यास पाठविले. त्याचा उद्देश सफल झाला. प्रत्यक्ष वाद-विवादात कालिदासांना बोलण्याची वेळ आलीच नाही. राजकन्याही कालिदासांच्या शिष्यांची गाढी विद्वता पाहून मनस्वी आनंदली. शिष्य असे तर गुरु कसे. तिने लग्नाला होकार दिला. राजकन्येचे लग्न कालिदासांसोबत थाटामाटात झाले. मात्र जी पतीच्या सहवासात आल्यावर, तो अक्षरशत्रु आहे लक्षात आले. तिच्या साऱ्या अपेक्षा फोल ठरल्या. तिने रागाच्या भरात त्याला विचारले. ‘अस्ति कश्चित वागर्थ: ?? (वाङ्‌मयावद्दल विशेष  ज्ञान आहे काय ?) कालिदासांना तो अपमान वाटला. मंत्र्याने त्यांना तुला राजा करतो म्हणून सांगून, सोबत विद्वान देऊन ही सारी खेळी केली. यात कालिदासांचा काय दोष? ते तेथून निघून गेले. राजकन्येने त्यांना सरस्वतीची उपासना करण्यासाठी कालिमातेस प्रसन्न करून घेण्यास सुचविले होते.  पत्नीचा मर्मभेदी प्रश्न त्रिशुळासारखा त्यांचे अंतःकरण आरपार भेदून रुतून बसला होता. त्यांनी त्या नगरापासून दूर विदयाक्षेत्री मन लावून विद्या संपादन केली. अपारविद्वत्ता प्राप्त करून घेतल्यामुळे आणि बहुश्रुततेमुळे त्यांच्या ठायीच्या उपजत काव्यप्रतिमेला बहर आला. त्यांनी संस्कृत भाषेत अलौकिक अशी साहित्यरत्न निर्माण केली. मेघदूतम्, ऋतुसंहारम्, अभिज्ञान शाकुंतलम्, रघुवंशम् कुमारसंभवम्, मालविकाग्निमित्रम्, विक्रमोर्वशीय अशा एकाहून एक सरस कलाकृती त्यांच्या प्रतिभेने आपल्याला दिल्या. ते अनेक वर्षानंतर पुन्हा मुद्दाम पत्नीकडे गेले. त्यांना पहाताच राजकन्येने पुन्हा तोच प्रश्न केला,
   ‘अस्ति कश्चित् वागर्थ:?’  यावर उत्तरादाखल त्यांनी ‘अस्ति’ पासून प्रारंभ झालेल्या कुमारसंभवाचा पहिला चरण’ अत्युत्तरस्यां दिशि देवात्मा गाऊन दाखविला, तर ‘कश्चित्’ पासून सुरू होणारा मेघदूताचा पहिला चरण 
   ‘ अस्त्युत्तरस्यां दिशि देवात्मा’ गाऊन दाखवला. तर
   ‘कश्चित’ पासून सुरु होणारा मेघदूताचा पहिला चरण 
   ‘कश्चित्कान्ता विरहगुरुणा स्वाधिकारात् प्रमत्तः’ गाईले. ‘वागर्थ:’ या शब्दापासून रघुवंश काव्याचा सुरू होणारा प्रारंभ ‘वागर्थानिवसंपृक्तौ’ म्हणून दाखविला. यानंतर राजकन्येने सुखाने संसार करण्याची विनंती केली पण त्यांनी ती अमान्य केली. जेव्हा राजकन्येने अपमान केला तेव्हाच त्यांनी संसारविचारावर पाणी सोडले. स्वैर जीवन कंठीत कालिदास फिरत राहिले. त्यांना प्रतिष्ठेचा, नावलौकिकाचा मोह नव्हता. ते जिथे जात तिथे आपली ओळख कधीही सांगत नसत. अनेक मोठे राजे, विद्वान
यांची कालिदासांवर नितांत भक्ती, आदर, प्रेम होते.

                  भारतीयांना कालिदासांचा अभिमान आहेच; पण परदेशातील अनेक कवी, नाटककार यांनाही ते आदर्श वाटत होते. सर वुइल्यम जोन्ससारखा इंग्लिश पंडितही त्यांना इंडियन शेक्सपियर  म्हणून  गौरवत होते.

सौ. आशा अरुण पाटील

2 Replies to “महाकवी कालिदास”

Comments are closed.

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!