नियतीचा खेळ

नियतीचा खेळ
एके दिवशी सकाळीच मोबाईलची रिंग वाजली ,त्या रिंगचा आवाज ऐकून स्वप्ना, सुनिलला फोन घेण्याविषयी सांगत होती सुनिलने फोन घेतला. नागपूरला जायचे म्हणून स्वप्ना सकाळीच लवकर उठली. तिचा तीन वर्षांचा मुलगा सुरज आणि सुनिल यांची गावाला जाण्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली. सुनिलचे वर्क फ्रॉम होम होते. त्यामुळे त्याचा आता मुक्काम जास्त दिवस होता म्हणून त्यांनीं भराभरी केली.
गौरी गणपती झाल्या. सुनिल ला थोडी, थोडी कणकण जाणवत होती. घरातील सर्व त्याला म्हणत होते चल दवाखान्यात जाऊ,
त्यावर सुनील म्हणायचा,
मला काही झाले नाही. असे दोन चार दिवस गेले. औषध पाणी घेतले पण सुनिलला आरामच पडेना. त्याच्या मनात बहुतेक कोरोनाची भिती होती असे सारखे वाटायचे म्हणून तो जात नव्हता की काय हेच कळेनासं झाले. शेवटी व्हायचे ते झालेच.
सासूबाई तिचे सांत्वन करू लागल्या तेव्हा अधिकच स्वप्ना बेचैन झाली ,पण तीच मनाला समजूत घालत होती ही तर त्याची आई आहे, तिने काय करावे,?वडील आहेत. पदरात तीन वर्षाचे मूल आहे असे करून कसे चालेल म्हणून तिने सर्वांच्या वेदनामयी चेहऱ्यावर नजर टाकली आणि स्वत:ला सावरले आणि मनाला उभारी दिली. अचानक सुनिल चे आजोबाही त्या दुःखाने उन्मळून पडले. एका महिन्यात स्वप्नाने एकटीने तीन मृत्यू जवळून पाहिले होते जणू दुखावरील तिची आता नजर मेली होती. स्वप्ना, सुनिलची आई आणि सुरज हे तिघेच आता घरात होते. घर खायला उठले होते, स्वप्नाच्या स्वप्नांचा चुरा झाला होता. स्वप्नाचा मुलगा रोज स्वप्नाला रात्री बाबांविषयी विचारत होता.
“तेव्हा तिचे काळीज पाणी,पाणी व्हायचे ” स्वप्नाच्या आई बाबांना देखील पुणे येथून येता आले नाही ही अशी कहाणी स्वप्नाची ऐकून मनात कोलाहल निर्माण झाले होते ती पुरती डळमळीत झाली होती पण तसे होऊन चालणार नव्हते कारण
यापुढे तिच्या समोर प्रश्न होता आता पुढे काय?तिने नौकरी सुरू केली ती तिच्या बाळासाठी—-
सौ वंदना कुलकर्णी
कोरोनाच्या काळात जिथे दुनियाच हादरली तिथे माझ्यासारख्या सामान्य गृहिणीचं काय? मी सुनील आणि आमचा तीन वर्षाचा गोड छोकरा. आम्ही तिघे पुण्यात राहात असलो तरी आई-बाबांकडे गौरी गणपतीच्या सणाला नागपूरला जायचं ठरवलं. तसे कळवले होते पण यावर बाबांनी इकडे नागपूरला कोरोनामुळे वातावरण जास्तच बिघडले आहे तिकडे पुण्यातच रहा असाही सल्ला दिला. पण आमच्या दोघांच्या निर्णयापुढे बाबाही गप्प झाले. सुनिल, सूरज आणि मी. दरवेळी यांच्या ऑफिसमुळे रहायला वेळ मिळतच नाही. एकदा सुरजच्या शाळेची घाईगडबड सुरु झाली की मग कुठे एखादा दिवस थांबणेही कठीण होईल. सध्या कोरोनाच्या या वातावरणात सुनिलचे वर्क फ्रॉम होम असल्याने यावेळी नागपूरला मनसोक्त राहायला मिळणार होते. आम्ही तिघं आणि आई-बाबाही होतेच. एकंदरीत आमचा प्रवास छानच झाला, गेल्यावर सगळ्यांची ख्यालीखूशाली विचारून सांगून झाली. दिवस आनंदात जात होते. गौरी गणपतीचे दिवस जवळ येवू लागले. तशी माझी कामाची गडबड सुरु होऊ लागली. भरपूर काम असे पण तरीही मदत करशील असं म्हणल्यावर तो वेळ मिळेल तसे मी मदत करेन असे आश्वासकपणे म्हणाला पण त्याचे ऑफिसचे काम भरपूर होते.

पहाता पहाता गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात पार पडला. सूरजला तर देवबाप्पापासून हलूच वाटायचं नाही. सूरजला सणासोबत प्रेमाची दाट छाया अनुभवताना तो छान स्थिरावला होता. अचानक एके दिवशी सूनिलला थोडीशी कणकण जाणवली. तसे आम्ही घरातले सारे त्याची काळजी घेत होतो. त्याचे विचार मात्र नकारात्मक होते. तसे पहाता मी सुनिलपेक्षा जास्त भावूक होते. म्हणजे माझ्या आयुष्यात मी बरेच प्रसंग अनुभवले होते. खरंच आयुष्यात बऱ्याच गोष्टी या होवून गेल्याने साध्या साध्या गोष्टींची भिती वाटू लागते. पण तरीही मी आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला धैर्याने सामोरे जात होते. आयुष्य म्हणजे माझ्यासाठी खरं तर जुगार. पहिला प्रेमविवाह झाला होता. इथे पहिला म्हणण्याचे कारण आम्हा दोघांचाही हा दूसरा विवाह. माझ्या पहिल्या पतीने आत्महत्या केली होती. तर सुनिलने त्याच्या पहिल्या पत्नीसोबत काडीमोड केली होती. खरेच दोन वेगवेगळ्या व्यक्तींना आयुष्यात तडजोड करावी लागतेच. “जुने जाऊदया मरणा लागून, जाळूनी किंवा पुरुनी टाका, शोधू आपण नवीन वाटा.” या उक्तीनुसार आम्ही पुन्हा एकदा नव्याने सुरवात करायची ठरवलं आम्हा दोघांचे कुटूंबीय तयार होते. खर तर माणसं मनाने आणि शरीराने तयार व्हावी लागतात. दोन्हीची एकत्रित कृती झाली नाही किंवा योग्य ताळमेळ बसला नाही तर काहीतरी विपरीत घडते. हे घडू नये याची काळजी दोन्हीकडच्या व्यक्ती घेत होत्या. पहाता पहाता जीवनाची विस्कटलेली घडी आम्ही व्यवस्थित बसविण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि आम्ही यशस्वीही झालो. आमच्या संसारात छानसा आशेचा किरण सूरजच्या रूपाने प्रवेशला. आमचं जीवन उजळलं. जीवनाला एक निश्चित दिशा आणि पथदर्शन मिळाले. आमचे जीवन क्षण आनंदले कधी स्थिरावले, कधी स्वप्नाळले. पण या कोरोनाच्या काळात निष्काळजी व नकारात्मकतेने सुनिलला घेरले. आणि माझ्या आयुष्याच्या पटलावर प्रयत्नपूर्वक सुखाचे चितारलेले संसाराचे सप्तरंगी चित्र आज काळवंडले. अचानक एक दिवशी तापाचे निमित्त ठरून तो गेला. खरंच सुख-दुःखाच्या या खेळात माझ्या वाट्याला दु:खाश्रूंची काही कमी नव्हती. सासऱ्यांनाही हे दु:ख सहन झाले नाही. त्यांनी जगाचा निरोप घेतला. आयुष्य निराशेने ग्रासले. सूरजने जगण्याचं कारण आणि दिशा दिली. मी फिनिक्स पक्षी होवून नवीन स्वप्नांच्या दिशेने त्याने सूर मारावा तसे स्वप्नांचे आकाश कवेत घेऊन उडण्यासाठी नोकरी सुरु केली. हा माझा लढा एकटीचा नव्हता. मी, सासूबाई आणि सुरज साथीने जीवनपथावर चालू लागलो.

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Don`t copy text!