विठ्ठला विठ्ठला

 • विठ्ठला विठ्ठला
  भक्ती तुझी केली
  संकटातूनी नित्य

  तूच तारी।।१।।
  विठ्ठला विठ्ठला
  वारी तुझ्यासाठी
  कर्म धर्म सारे
  घडवी तूची ।।२।।
  विठ्ठला विठ्ठला
  चंद्रभागे तीरी
  वाळवंटी भासे
  देहूची आळंदी ।।३ ।।
  विठ्ठला विठ्ठला
  काम धाम चाले
  कणा कणात
  व्यापून तू राहसी ।।४।।
  विठ्ठला विठ्ठला
  नामदेव पायरी
  पदस्पर्श अवघे
  द्यावे तूची।।५।।
  विठ्ठला विठ्ठला
  नाम जप तुझा
  तूच जणू आरसा
  माझ्या ठाई।।६।।
  विठ्ठला विठ्ठला
  झालो परमानंदी
  अवघे न अंतर
  तुझ्या माझ्या मधी।।७।।

  *सौ आशा पाटील*

13 Replies to “विठ्ठला विठ्ठला”

 1. खूप छान ! आवडले भक्तीगीत.

Comments are closed.

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Follow by Email
Don`t copy text!