विठ्ठला

मुख तुझे साजरे
विसावा मनास लाभे
सुख दुःख न वाटे
जीवनात बा विठ्ठला

आसुसले तन मन
पाहण्या तुझे मुख
नको मजला धन
अवघी दर्शनाची भूक

जयघोष तुझ्या नामाचा
मुखी माझ्या असावा
पाप पुण्याच्या हिशोबी
देहास मिळावा विसावा

माहेरी येती भक्तगण
मायेच्या कृपेची पाखरण
चरण स्पर्शानेही मिळे
  स्वर्ग सुखी रमती जन

न वाटे मजला त्रास
क्षणिक सुख दुःखाचा
  चरणी राहो तुझीया
  जीव अखंडीत

सौ. आशा पाटील.

7 Replies to “विठ्ठला”

  1. खूप सुंदर रचना, विठुरायाचा महिमा .
    श्री हरि पांडूरंग……

Comments are closed.

error

शेअर करा व्हाट्सअप वरती

WhatsApp
Follow by Email
Don`t copy text!