
रुसला का पाऊस?
कडकडणारे ऊन सोसून, डोळे थकले नभाकडे लावून,
थेंबासाठी आसुसली माती, बसली आहे सुस्कारून.
हिरवे डोंगर उजाड केले, सिमेंटची उभी केली भिंत,
स्वार्थापायी विसरलो सारे, निसर्गाशी तोडली प्रीत.
नद्या सुकल्या, विहिरी आटल्या, ओस पडली शिवाराची वाट,
झाडे तोडून स्वतःच केली, संकटांची काळी पहाट.
पाऊस नाही, फक्त उकाडा, मनामध्ये वाढली खंत,
धरतीमातेच्या वेदनेसमोर, हरवून बसलो आपली शुद्ध.
झाडे लावू, पाणी जपू, निसर्गाशी जोडू नाते,
तेव्हाच पुन्हा बरसेल पाऊस, हसेल धरती आनंदात.
चला पुन्हा हिरवाई फुलवू, धरतीला देऊ नवा श्वास,
निसर्गाशी मैत्री केली, तर रुसणार नाही पाऊस खास.