अघटीत

                                    अघटीत                               हिरव्यागार वनराईत मस्त पक्ष्यांचा किलबिलाट, सोबत आदित्य होताच. निसर्गाचं सौंदर्य नजरेतून सहज टिपावं असं मन मोहून टाकणारं. आकाशात सूर्य उगवण्यापूर्वी तांबडं फुटलेलं, पक्ष्यांच्या रांगा एका मागोमाग एक छान उडत होत्या. ती आदित्यला हे सारं पुन्हा पुन्हा दाखवत होती. बघ ना! गवताच्या पात्यांवर तो दवबिंदू. एखादा  मोती दिसावा तसा दिसतोय. अन् त्यावर सूर्यकिरण  पडून … Read more

नाणं आपलंच

नाणं आपलंचसरिता माझ्यावर जोरात व्हसकली.‘आई अहो, टेबलक्लॉथ गहाण झाला ना! नीट जेवता येत नाही का?’दीपक पुढेच बसला होता पण शब्दही बोलला नाही. मला खरंतर खूप वाईट वाटले होते पण तरीही,‘बरं बाळा पुन्हा नाही सांडणार.’या माझ्या वाक्यावर सरिता पुन्हा चिडली.‘बाळा नका म्हणू मला. तुम्हीच बाळासारखे वागता.’निश्चल शांतपणे बसून विचार करत होता.कारण आपले आई-बाबा आपल्या आजीवर का … Read more

अस्तित्व

अस्तित्वकाल सकाळपासून सारखं गरगरल्यासारखंच वाटत होतं. दररोज पहाटे साडेचार-पाचला उठणारी मी, आज साडे सहा वाजले तरी अंथरुणातून हलले नव्हते. नवीनला त्याच्या मोबाईलवर गजर झाल्याने जाग आली. तो उठल्यानंतर त्याला मी उठले नाही याचे प्रथम आश्चर्य वाटले. पण कदाचित रात्री लवकर झोप लागली नसेल म्हणून… थोडावेळ ऑफिसचं काम करु असा विचार करत त्याने काम सुरू केले. … Read more

मनोबल

डॉक्टरांनी यांना शाळेतून त्यांच्या वेळची दहावीच्या मुलांची यादी आणायला सांगितली. यांनी प्रथम कशाला यादी म्हणून चीडचीड केली. समजावून सांगितल्यावर प्रयत्न सुरू केले. यांना रजिस्टर मिळालेही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यातील मित्रांचा शोध घेण्याचा चंग यांनी बांधलाच होता. हळूहळू एक एकाची माहिती यांना मिळाली. त्यांच्या बरोबरच्या सर्वांच्या माहितीचे यांनी संकलन केले. त्या यादीपैकी वीस मित्रांचा मृत्यू झाला होता. … Read more

तोडगा

‘धरलं तर चावतंय अन सोडलं तर पळतंय.’करावं काय तेच मला समजत नव्हते. साथीदार नसल्याने एकटेपणा जाणवत होता. पण मग काय करावे ते सूचतही नव्हते. तोडगा तर काढायलाच हवा. पण तो कसा… मला एवढा एकटेपणा वाटेल याची यत्किंचितही कल्पना माझ्या मनात कधी आलीही नव्हती. वयाच्या पन्नासाव्या वर्षी साथीदाराने साथ अर्ध्यावर सोडली. पण आपलं ते संचित असावं … Read more

पर्याय

मला आवरून बाहेर निघालेली पाहून वंदनाताई म्हणजे माझ्या सासूबाई जरा नाराज झाल्या.‘काय या आजकालच्या मुली, शरद जावून दोनच महिने झाले आणि लागली उधळायला. नौकरी करणं एवढं महत्त्वाचे आहे का?’असेच काहीसे भाव त्यांच्या नजरेतून व्यक्त होत होते. त्यांना पेन्शन मिळत होतीच. शरद गेल्यानंतर त्यांची पेन्शन हाच आधार होता साऱ्या कुटूंबाला. वंदनाताईंची दोन मुलं, शरद आणि रिता. … Read more

रोपटं

मी या प्रेमाने आणि आपुलकीने तयार झालेल्या घरात आजतागायत म्हणजे वयाची सत्तावीस वर्षे पूर्ण होईपर्यंत राहिले. तशी मी सतरा- अठरा वयाची होईपर्यंतच राहिले. पुढील शिक्षण घेण्यासाठी बाहेर पडले. अजाण वयात मला बाहेर पडताना वाईट वाटत होते. अगदी आईच्या गळ्यात वगैरे पडून रडले नसले तरी एकांतात तरी दोन अश्रू गाळले. समोर स्वप्नांमध्ये पाहिलेली दुनिया खुणावत होती. … Read more

वाताहत

तेजूला गेट टुगेदरला भेटून पंधरा दिवस झाले. पण मला तर खूप दिवस झाले असे वाटत होत. माझ्या बालपणीची मैत्रिण. शाळेनंतर आम्ही पुन्हा कधी भेटलोच नव्हतो, माझा लहानपणीचा आणि कॉलेज जीवनातला तडफदारपणा आता जणू हरवला असेल तिला जाणवल्यास तिनं मला नमूद केलं होतं. महिन्यापूर्वी यांनी आजारी पडले आणि आठ दिवसापूर्वी डॉक्टरांनी आता देवावर भरोसा ठेवा म्हणून … Read more

मानापमान

मी जरा रागानेच ऑफिसला निघाले होते. तेवढ्यात सासुबाईनी ‘अगं न जेवता अन् डबा न घेता जावू नकोस,’ असं सांगितल्यावरही मी तशीच घराबाहेर पडले. मागे एकदा माझ्याकडून भाजीला जरा मीठ जास्त झाले तर समीरने घर पार डोक्यावर घेतलं. नुसतं डोक्यावरच घेतलं नाही तर त्याने मला बरंच काही ऐकवलं. तो म्हणाला, ‘मी दिवसभर मरमर करून काम करतो, … Read more

ताळमेळ

मी आवरले अन् मंदिरात जाण्यासाठी घरातून बाहेर पडणार तेवढ्यात स्वयंपाकघरातील संवाद कानावर पडला. अन् आपोआपच माझी पावलं मंदिराकडे जाण्याऐवजी स्वयंपाक घराकडे वळली. शेवटी आपल्या घरातल्या प्रश्नांना आपण नाही तर कोण उत्तर शोधणार? शेवटी घर म्हणजे तरी काय? चार भिंतींना प्रेमाने सांधणं अन् जिव्हाळ्यानं एकमेकांना सावरणं, आजपर्यंत घराचं मांगल्य, निर्मलता, पावित्र्य होतंच ते सानिकाने चुढे तसचं … Read more

WhatsApp
error: Content is protected !!