भूमिका

तीच्या नजरेतून आज मला एटीएम मशीनमधून पैसे काढून आणावेच लागणार होते. या महागाईच्या वाढत्या भस्मासूराच्या काळात महिन्याला पंधरा-वीस हजारात कसे तरी भागवावं लागतं. कॉलेजची फी,  पुस्तक-वह्या जेवण-रहाणं सारं सारं. मी या साऱ्या विचारातच शांत अशा ठिकाणी असलेल्या एटीएम मशीनकडे गेले. गर्दीच्या ठिकाणी रांगेत उभा राहून वेळ तर जातोच.  काहीतरी वेगळाच गोंधळ होवून बसतो. मी   … Read more

दोन दिवस

                            दोन दिवस  क्षण असा एकही नाही उसंत वाटे कधी जीवाला आठवणींची वाहे नदी जावे दोन दिवस माहेराला मी गाणं गुणगुणतच बँग भरत होते. काही दिवसांपूर्वीच पाडवा आणि भाऊबीज झाली. एका दिवसात दोन सण म्हणजे अगदी दोन दिवसात दीपावली पार पडली. सासूबाईंना मात्र मी माहेरी जाणार म्हणल्यापासून चीड चीड होवू लागली होती. त्यांची स्मिता शनिवारी येणार … Read more

दिव्यत्व

          गीताने चेहऱ्याला स्कार्फ बांधला. अन् ती गाडीची चावी पर्समध्ये शोधू लागली. दोन तीन कप्पे धुंडाळले, तरीही चावी काही सापडेना. शेवटी तिने पुन्हा एकदा मोबाइलचा कप्पा शोधला. अन् काय नवल, तिथे चावी होती.  काही क्षणापूर्वी तिने हाही कप्पा शोधला होता. तिला घाई झाली म्हणजे नेहमीच असे वाटे की, खरंच चावीलाही मोबाइलसारखी रिंगटोन सिस्टीम हवी, म्हणजे घाईच्या … Read more

वेळ

आज मी गडबडीने स्वयंपाक केला. घाईघाईने सर्वांना व्यवस्थित जेवायला वाढले, आपलं आटोपलं. आता दोन घास खावे ठरवून स्वतःला घेतलं आणि सासूबाईंना गोळ्या द्यायच्यात हे आठवलं. तेवढयात ऑफिसमधील सेजलजचा फोन.गाडी बिघडल्याने तिला ऑफिसला जाताना घेवून जायचे होते. म्हणजे दोन घास खायला देखील आज जमणार नव्हते. कालचा उपवास असल्याने भुक लागली पण खात बसले तर ऑफिसला जायला … Read more

अट्टाहास

अट्टाहास           सुनंदा सकाळपासून बेचैन होती. तिला आपल्यात काही तरी वेगळे जाणवत होते. सतत चक्कर अन् अधूनमधून कोरड्या उलट्या. यामुळे तिला जीव नकोसा झाला होता. घरातील सर्वजण अस्वस्थ होते. सासूबाईंना घेऊन ती दवाखान्यात गेली. दवाखान्यात त्यांना बराच वेळ लागला. दवाखान्यात बरीच गर्दी होती. घरी सारेजण चिंतेत होते. लीना तर सारखी आईला फोन करून वहिनीविषयी विचारत होती; … Read more

शंतनू

शंतनू           मी क्रिडांगण पार करून पटकन गाडीवरून घर गाठावं असं मनाशी ठरवतच शाळेच्या ऑफिसमधून बाहेर पडले होते. मी विचार करतच चालले होते. इतक्यात मला जाणवलं की, कोणीतरी माझ्यासमोर  उभा आहे. मी माझ्या तंद्रीतच, त्याला न पाहता दुस-या बाजूने जावू लागले पुन्हा ती व्यक्ती माझ्या रस्त्यात उभी. छे! हा काय पोरकटपणा चाललाय. मी शिक्षिका होवूनही वीस … Read more

अश्रू

आयुष्यात कर्तव्य करणं हे प्रत्येक स्त्रीच्या वाटयाला येतंच तसं ते माझ्याही आलं. मी ते प्रामाणिक आणि मनापासून केलं. माझं नाव जयमाला. मी पेशाने शिक्षिका. एक मुलगा- एक मुलगी आणि पती. चौकोनी कुटूंब होतं. खरंतर देशाचे नागरिक घडविण्याचे महत्वपूर्ण काम शिक्षक मन लावून करतात, मीही केलं. आयुष्यात हाती घेतलेलं काम पूर्ण तर करायचंच पण ते काम … Read more

जागर विचारांचा

“रिना एवढ्या घाईत कुठे चाललीस’‘अगं काही नाही. नवरात्राचे घट उठवायचे आहेत. परड्या भरायच्यात, नेहमी येणाऱ्या परडीवाल्या मावशी आज आल्याच नाहीत. म्हणून वाट पाहून घाईघाईने बोलवायलाच निघालेय.’तिची घाई बघता मला कसेतरी वाटले. – दोघीही नौकरी करणाऱ्याच. माझ्या घरीही आज सण, एकत्र कुटूंबात राहणारी मी आज सणादिवशीही व्यवस्थित आवरून ऑफिसला निघाले होते. ऑफिसपासून घर तसे अर्धा-पाऊण तासाच्या … Read more

दुर्गा

रितीका घाईघाईने आवरत होती. तिला आज नवरात्रोत्सवात स्त्रियांचा सन्मान करण्यासाठी यादी काढायची होती. मोठमोठ्या पदावर असणाऱ्या स्त्रियांना सत्कारित करण्याची योजना होती. खरंतर अशा अनेक स्त्रियांना ती ओळखत होती. पण यावर्षी काहीतरी वेगळं कर असा माझा आग्रह होता. त्याच त्या व्यक्तिंना पुरस्कार देणं किंवा सन्मान करणं एवढं महत्वाचं नाही. त्यापेक्षा समाजातील अशा स्त्रियांचा शोध घे ज्या … Read more

दसरा विचारांचा

विचारांचा दसरा मी घाईघाईने नवरात्रीची तयारी म्हणून घरं आवरायचा प्रयत्न केला. पण सासूबाई घरात‌लं कोणतंच सामान जे सध्या उपयोगी नाही ते काही टाकूच देत नसल्याने लाखो रुपये खर्च करून जणू या सामानासाठीच घर बांधलं की काय असा प्रश्न माझ्या अन् राजेशच्या मनात येत असे. मी लग्न होवून आले तेव्हा तर एकत्र कुटुंब अन् सामानाची रेलचेल … Read more

WhatsApp
error: Content is protected !!