भूमिका

श्रीकांत सर हे एका गावातील प्राथमिक शाळेत शिक्षक होते. त्यांनी आपल्या आयुष्याला शिक्षणाच्या सेवेचे व्रत मानले होते. विद्यार्थ्यांसाठी ते केवळ शिक्षक नव्हते, तर मार्गदर्शक, मित्र आणि कधी कधी पालकही होते. पण गेल्या काही वर्षांत शिक्षण क्षेत्रात आलेल्या बदलांनी त्यांच्या कामाचा ताण प्रचंड वाढवला होता. सरकारकडून येणाऱ्या नव्या योजना, रोजच्या अहवालांचा पाठपुरावा, नवीन प्रशिक्षण कार्यक्रम, आणि … Read more

माहेरवाशीण

संक्रांत सणाच्या आगमनाने गावात एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. थंडीच्या दिवसांतले हे सणावाराचे दिवस वातावरणात एक वेगळाच आनंद आणि उबदारपणा घेऊन येतात. राधिका, एक साधी गृहिणी, माहेरवाशीण म्हणून तिच्या माहेरच्या गावी परतण्याच्या ओढीने भारावून गेली होती. राधिका माहेरची आठवण सतत मनात ठेवणारी. लग्नानंतर ती पती आणि सासरच्या जबाबदाऱ्यांत अडकली होती. माहेरच्या ओढीने तिला प्रत्येक सण, … Read more

गेट टुगेदर

गेल्या कित्येक वर्षांनंतर कॉलेजच्या गेट-टुगेदरचा कार्यक्रम आयोजित झाला होता. जुन्या मित्रांना भेटण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होती. मोहिनीही या कार्यक्रमाला आली होती. ती साडी नेसून, साध्या पद्धतीने तयार होऊन आली होती, तिच्या चेहऱ्यावर अनुभवाच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. पण तिच्या डोळ्यांमध्ये जुन्या आठवणी जाग्या झाल्या होत्या. मोहिनीने हॉलमध्ये प्रवेश केला, तशी तिला एक ओळखीची छटा … Read more

नवीन सुरुवात

एक नवीन सुरुवात राजीव एका मोठ्या कंपनीत काम करणारा मेहनती कर्मचारी होता. त्याचं आयुष्य चांगलं चाललं होतं, पण त्याला नेहमी जाणवायचं की काहीतरी कमी आहे. कामाच्या व्यापात तो स्वतःसाठी वेळ देत नव्हता—ना फिटनेसकडे लक्ष, ना छंद, ना मित्रांशी संवाद. दररोज सकाळी तोच दिनक्रम आणि संध्याकाळी तोच कंटाळवाणा थकवा. नवीन वर्ष जवळ आलं तसं त्याच्या मनात … Read more

ओझं अपेक्षांचं

ओझं अपेक्षांचं अंशिका बारावीच्या परिक्षेला बसली होती. घरात प्रत्येकाकडून तिच्यावर खूप अपेक्षा होत्या. आईला वाटत होतं, “माझी मुलगी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होईल.” वडिलांना वाटत होतं, “अंशिका इंजिनिअर होऊन घराचं नाव उज्ज्वल करेल.” तिच्या मोठ्या भावाला वाटत होतं, “माझ्या बहिणीने सर्वोत्तम कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा.” अंशिकाच्या मनावर या सर्व अपेक्षांचं ओझं होतं. ती हुशार होती, पण परिपूर्ण … Read more

सावलीचा साक्षीदार

             गावातील वटवृक्षाच्या सावलीत सरोजा रोज येत असे, तिच्या हातात पुस्तक असायचं, पण डोळे नेहमीच कुठेतरी हरवलेले. रवी तिथून रोज जात असे, त्या विशाल वटवृक्षाखाली बसायला त्यालाही आवडले असते. पण तो नुसतं येता जाता तिच्याकडे पाहायचं असं ठरवायचा. पण पाहायचं धाडस मात्र कधी केलं नव्हतं त्याने. तिच्या मोकळ्या केसांमध्ये वारं खेळायचं, आणि त्याला उन्हाच्या तिरीपी मध्ये … Read more

निरभ्र

                     शनया शांत झोपली होती तिच्या मुख कमलावर तिचे आलेले कुरळे केस पाहून रवीला ते हळूच सरकवावे आणि तिच्या गालावर प्रेमाने हळुवार हात फिरवावा असे वाटले पण दुसऱ्याच क्षणी त्याने तो विचार मनातून काढून टाकला. शांत झोपलेल्या आपल्या पत्नीची झोप मोड करणं त्याला उचित वाटलं नाही. आधीच काल हॉस्पिटलमध्ये जास्त पेशंट असल्याने त्याला घरी यायला … Read more

वेळ

सरिताचा कालच फोन आला.  ‘नमिता वहिनी, मार्गशीर्ष महिना आला आहे. आपण विष्णू पदाला जाऊ.’  माझं अन् सरिताचं बोलणं वैदेही ऐकतच होती. कॉलेज वयीन वैदेहीला पंढरपूर म्हणजे एक वेगळंच काहीतरी असं वाटत होतं. परवाच ती मुंबईहून आमच्याकडे आली होती. पंढरपूर म्हणजे मंदिरांचे शहर, पंढरपूर मध्ये विठ्ठलाची पवित्र नगरी. इथे अखंड हरिनामाचा जप चालतो. हे सगळं मुंबईत … Read more

जवळची वाट

                शाळा सुटूनही बराच वेळ झाला. सारंग काही शाळेतून घरी परतला नव्हता. म्हणूनच त्याच्या आईला काळजी वाटू लागली. ती घरामध्ये फेऱ्या घालू लागली. सांरग सकाळी अकरा वाजता शाळेत गेला होता. शाळेत जाताना, त्याने यायला उशिर होईल. असा काही मेसेज दिला नव्हता. तो स्वराजबरोबर शाळेला ये-जा करीत असे. हे आठवून सोसयटीतच रहात असलेल्या स्वराजच्या घरी काकू चौकशीला … Read more

तिरंगा

                                  तिरंगा शार्दुलला गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रप्रेमामुळे सीमेवर जाण्याचे वेड लागले होते. त्याला लहानपणापासूनच सैनिक, सैनिकांचे जीवन याविषयी आकर्षण आणि आदर वाटत होता. खरं पाहता लहानपणी सैनिकांसारखा ड्रेस घातला म्हणजे त्याची छाती गर्वाने आणि मान अभिमानाने ताठ होत असे. हेच स्वप्न उराशी बाळगून तो वाढत होता. त्याचे बाबा, काका आणि आजोबा हे तिघेही सैन्यातच होते. म्हणूनच … Read more

WhatsApp
error: Content is protected !!