वाचाल तर वाचाल

असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगत होते. त्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. आपण ज्ञान संपादन करतो. आपली विचारशक्ती वाढते. आपल्याला चांगल्या गोष्टीची प्रेरणा मिळते. वाचनामुळे मेंदूला चालना मिळते. आपल्या जीवनाला उन्नत करणारी गोष्ट म्हणजे वाचन. जागतिक पुस्तक दिन २३ एप्रिल रोजी आपण साजरा करतो. लोकांमध्ये वाचनाची सवय वाढवणे आणि जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणे हे … Read more

वानप्रस्थाश्रम

‘नलिनी, नलिनी.’‘सरिता, तू केव्हा आलीस.’सरिता अन् नलिनीच्या गप्पा छानच रंगल्या. नलू अन् सरू याच नावाने त्या दोघी एकमेकींना हाक मारत. सरिताची आज चाललेली धावपळ पाहून नलीनीने आश्चर्याने विचारले.‘आज काय विशेष बाईसाहेब. खूप गडबडीत आहात तुम्ही.’ अगं आज आत्तू येणार आहेत.’‘आत्तू अरे वा! मुंबई वरून यायला वेळ लागेल ना! यावर सरिताने केलेला खुलासा ऐकून नलिनी एकदम … Read more

क्रांतिकारी महात्मा बसवेश्वर

हा सतत मोलाचा संदेश देणाऱ्या त्यांच्या आत्म्याचा हा आवाज होता. स्वतंत्र, समानतेने जगण्याचा हक्क असण्याची जाणीव अंत:प्रेरणेने दिली जाते. तर तो हक्क मिळविता येतो, याची जाणीव मात्र बाह्यप्रेरणेने मिळते. गांजलेले लोक कायम गांजलेले राहुच शकत नाहीत. केव्हातरी त्यांची ऊर्मी उफाळून बाहेर येतेच आणि ऊर्मी बाहेर येण्यासाठी बाहयप्रेरणा म्हणून गरिबांच्या अंतः प्रेरणेला चालना देणारा दीपस्तंभ म्हणजे … Read more

संचित

शारदा केव्हाची वाट पाहात होती. कोणीतरी येईल अन् तिला खुर्चीतून उठण्यास मदत करेल. माणसांनी गच्च भरलेलं घर. नवरा, सासू-सासरे, दोन मुलं, जाऊ-दीर, त्यांची मुलं आणि आजे सासूबाई. बघता बघता तिची स्वतःची मुलं केव्हा मोठी झाली ते तिला कळलंच नाही. मुलं लहान होती तेव्हा नोकरी करायची नाही, असं नवऱ्याचं म्हणणं होतं. ते तिनं मान्यही केलं. छोटा … Read more

अंतर

अंतर स्वराने सकाळीच फोन करून आईकडून सल्ला मागितला. तिच्या आईनेही लेकीला सल्ला दिला.‘तुला जमत नसेल तर मुलाला पाळणाघरात ठेव. शेवटी करिअर महत्वाचं.’मी हे सर्व पहात आणि ऐकत होते. खरंतर नातवाला पाळणाघरात ठेवणे ही संकल्पना माझ्या डोक्याबाहेरचीच पण आयटी कंपनीत जॉब करणाऱ्या सुनेला माझे विचार आणि संस्कार जुन्या वळणाचे वाटत होते. खरंतर मी शिक्षिका होते. हम … Read more

अचूक

अचूक‘रुचा, अगं चल पटकन, सगळे मिळून जेवण करू या. तसंही तुम्हाला रोज ऑफिस असतं.’माझी हाक ऐकल्याने रुचाला स्वयंपाक घरात यावं लागलं. खरंतर तिच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. शरदने पाहिल्यावर जवळ जात तो काहीतरी कुजबुजला, कसं काय कोण जाणो. पण मी वाक्य ऐकलं आणि मला वाईट वाटलं.‘काय मॅडम, वेळ झाली नाही का जेवायची.’‘नाही रे भूक लागलीय … Read more

अहम्

‘आई मी चार दिवसांसाठी माहेरी जावून येते,’असं रिताने म्हणजे सुनेने म्हणलं असतं तरी मला बरं वाटलं असतं पण रितानं आपल्या नवऱ्याजवळ म्हणजेच राजू जवळ हा मेसेज मला दिला. राजूने हा निरोप मला सांगितलाच नाही. रिता ज्यादिवशी माहेरी जाणार होती त्यादिवशी तिची चाललेली कामाची गड़बड पाहून मीच विचारले.‘रिता ऑफिस दहा वाजता असते. मग आज एवढी धावपळ. … Read more

योग्य निर्णय

‘अहो भावोजी, बरे आहात का? विनिता गेल्यापासून फोन करणं झालंच नाही.’ यावर भावोजींच्या उत्तराने मी चकित झाले. ‘सारं व्यवस्थित चाललेय. घरातील सर्वजण माझ्यासह व्यवस्थित आहेत. कामाला बायका लावल्या आहेत. आई- बाबा चारोधाम करायला गेलेत. मुलांची शिक्षणं व्यवस्थित चाललीत. मी सध्या इकडेच आलो बदली करून घेवून.’ मी विचारात पडले. विनिता असताना हे सर्व झालं असतं तर… … Read more

दोन शब्द

सदाशिवराव सेवानिवृत्त होणार म्हणून त्यांच्या बऱ्याच मित्रांनी पार्टी मागितली होती. सदाशिवरावांनी मला सांगून सारी तयारी करायला सांगितली होती. आयुष्यात सदाशिवरावांनी मोठमोठ्या पदांवर काम केलं. अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पेलवल्या. ते प्रत्येक जबाबदारी ९९% निभावत असले, तरी कौटुंबिक जबाबदारी मीच निभावत होते. आयुष्याच्या धावपळीत स्वअस्तित्वाचा ध्यास बाजूला ठेवून मी कर्तव्यतत्पर राहिले होते. आज नवऱ्याची सेवानिवृत्ती होणार होती. … Read more

महिला दिन

राष्ट्रपती पंतप्रधान पदही तू भूषवलेस्वतःसाठी वेगळे अस्तित्व निर्मिलेआपलेच सर्व हेच तत्व अंगिकारलेस्वतःसह सर्वांचा विकास तुलाच जमलेम्हणूनच तुला निर्मात्यानेही वंदिले ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. या महिलादिनाची सुरुवात होण्याचं कारण कामगार चळवळ ठरली. १९०८ झाली न्यूयॉर्क शहरात १५,००० महिलांनी मोर्चा काढला होता. त्यांच्या मोर्चाची कारणंही महत्वपूर्ण होती. कामाचे तास मर्यादित असावेत. योग्य वेतन … Read more

WhatsApp
error: Content is protected !!