अघटीत

                                    अघटीत                               हिरव्यागार वनराईत मस्त पक्ष्यांचा किलबिलाट, सोबत आदित्य होताच. निसर्गाचं सौंदर्य नजरेतून सहज टिपावं असं मन मोहून टाकणारं. आकाशात सूर्य उगवण्यापूर्वी तांबडं फुटलेलं, पक्ष्यांच्या रांगा एका मागोमाग एक छान उडत होत्या. ती आदित्यला हे सारं पुन्हा पुन्हा दाखवत होती. बघ ना! गवताच्या पात्यांवर तो दवबिंदू. एखादा  मोती दिसावा तसा दिसतोय. अन् त्यावर सूर्यकिरण  पडून … Read more

नाणं आपलंच

नाणं आपलंचसरिता माझ्यावर जोरात व्हसकली.‘आई अहो, टेबलक्लॉथ गहाण झाला ना! नीट जेवता येत नाही का?’दीपक पुढेच बसला होता पण शब्दही बोलला नाही. मला खरंतर खूप वाईट वाटले होते पण तरीही,‘बरं बाळा पुन्हा नाही सांडणार.’या माझ्या वाक्यावर सरिता पुन्हा चिडली.‘बाळा नका म्हणू मला. तुम्हीच बाळासारखे वागता.’निश्चल शांतपणे बसून विचार करत होता.कारण आपले आई-बाबा आपल्या आजीवर का … Read more

मनोबल

डॉक्टरांनी यांना शाळेतून त्यांच्या वेळची दहावीच्या मुलांची यादी आणायला सांगितली. यांनी प्रथम कशाला यादी म्हणून चीडचीड केली. समजावून सांगितल्यावर प्रयत्न सुरू केले. यांना रजिस्टर मिळालेही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यातील मित्रांचा शोध घेण्याचा चंग यांनी बांधलाच होता. हळूहळू एक एकाची माहिती यांना मिळाली. त्यांच्या बरोबरच्या सर्वांच्या माहितीचे यांनी संकलन केले. त्या यादीपैकी वीस मित्रांचा मृत्यू झाला होता. … Read more

तोडगा

‘धरलं तर चावतंय अन सोडलं तर पळतंय.’करावं काय तेच मला समजत नव्हते. साथीदार नसल्याने एकटेपणा जाणवत होता. पण मग काय करावे ते सूचतही नव्हते. तोडगा तर काढायलाच हवा. पण तो कसा… मला एवढा एकटेपणा वाटेल याची यत्किंचितही कल्पना माझ्या मनात कधी आलीही नव्हती. वयाच्या पन्नासाव्या वर्षी साथीदाराने साथ अर्ध्यावर सोडली. पण आपलं ते संचित असावं … Read more

पर्याय

मला आवरून बाहेर निघालेली पाहून वंदनाताई म्हणजे माझ्या सासूबाई जरा नाराज झाल्या.‘काय या आजकालच्या मुली, शरद जावून दोनच महिने झाले आणि लागली उधळायला. नौकरी करणं एवढं महत्त्वाचे आहे का?’असेच काहीसे भाव त्यांच्या नजरेतून व्यक्त होत होते. त्यांना पेन्शन मिळत होतीच. शरद गेल्यानंतर त्यांची पेन्शन हाच आधार होता साऱ्या कुटूंबाला. वंदनाताईंची दोन मुलं, शरद आणि रिता. … Read more

वाताहत

तेजूला गेट टुगेदरला भेटून पंधरा दिवस झाले. पण मला तर खूप दिवस झाले असे वाटत होत. माझ्या बालपणीची मैत्रिण. शाळेनंतर आम्ही पुन्हा कधी भेटलोच नव्हतो, माझा लहानपणीचा आणि कॉलेज जीवनातला तडफदारपणा आता जणू हरवला असेल तिला जाणवल्यास तिनं मला नमूद केलं होतं. महिन्यापूर्वी यांनी आजारी पडले आणि आठ दिवसापूर्वी डॉक्टरांनी आता देवावर भरोसा ठेवा म्हणून … Read more

मानापमान

मी जरा रागानेच ऑफिसला निघाले होते. तेवढ्यात सासुबाईनी ‘अगं न जेवता अन् डबा न घेता जावू नकोस,’ असं सांगितल्यावरही मी तशीच घराबाहेर पडले. मागे एकदा माझ्याकडून भाजीला जरा मीठ जास्त झाले तर समीरने घर पार डोक्यावर घेतलं. नुसतं डोक्यावरच घेतलं नाही तर त्याने मला बरंच काही ऐकवलं. तो म्हणाला, ‘मी दिवसभर मरमर करून काम करतो, … Read more

ताळमेळ

मी आवरले अन् मंदिरात जाण्यासाठी घरातून बाहेर पडणार तेवढ्यात स्वयंपाकघरातील संवाद कानावर पडला. अन् आपोआपच माझी पावलं मंदिराकडे जाण्याऐवजी स्वयंपाक घराकडे वळली. शेवटी आपल्या घरातल्या प्रश्नांना आपण नाही तर कोण उत्तर शोधणार? शेवटी घर म्हणजे तरी काय? चार भिंतींना प्रेमाने सांधणं अन् जिव्हाळ्यानं एकमेकांना सावरणं, आजपर्यंत घराचं मांगल्य, निर्मलता, पावित्र्य होतंच ते सानिकाने चुढे तसचं … Read more

बेचैन

माझी आवराआवर चालली होती खरी. पण मला तेवढा उत्साह, आनंद आणि नवीन ठिकाणी रहायला जायची उत्सुकता वाटत नव्हती. आम्ही दोघं आमच्या नरेंद्रकडे मुंबईला रहायला जाणार होतो. गेली तीस-पस्तीस वर्ष आम्ही दोघं सोलापूरला राहत होतो. यांच्या नोकरीमुळे कुठे जास्त येणं जाणं होत नव्हतं. पण आता यांनी रिटायर झाल्यापासून आम्ही दोघं निवांत होतो. खरं तर निवांत म्हणजे … Read more

माहेरपण आईचं

मी दादाला सांगून भाऊबीजेला गेल्यावर चार दिवस आईला आपल्या घरी आणलं होते. तसे आम्ही दोघंच बहिण-भावंडं, मी साताऱ्याला तर माझा राजू दादा मुंबईला. आई पूर्वी बाबा असताना गावाकडे रोपळ्याला राहत होती. आई बाबा दोघं असताना त्यांचा वेळ छान जायचा. आईला बाबांचं अन् येणाऱ्या जाणाऱ्यांचं करण्यात वेळ भुर्रकन उडून जायचा. बाबांची नौकरी  अन् शेती होती. त्यात … Read more

WhatsApp
error: Content is protected !!